अटल पेंशन योजना विषयी माहिती

Atal pension scheme information

अटल पेंशन योजना ही गुंतवणुकीशी संबंधित एक महत्वाची सरकारी योजना आहे.

आजच्या लेखात आपण अटल पेंशन योजना काय आहे? ह्या योजनेचे फायदे कोणकोणते आहेत इत्यादी बाबी सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.

अटल पेंशन योजना काय आहे ?

अटल पेंशन योजना ही एक सरकारी पेंशन स्कीम आहे. ज्यात गुंतवणुक करून आपण आपले म्हतारपण सुरक्षित करू शकतात.

अटल पेंशन योजना ही स्कीम असंघटित क्षेत्रातील कामगारांना,श्रमिकांना वंचितांना लक्षात घेऊन शासनाकडून सुरू करण्यात आली आहे.

अटल पेंशन ही योजना २०१५ मध्ये भारत सरकारने सुरू केली होती.हया योजनेसाठी १८ ते ४० ह्या वयोगटातील व्यक्तींना पात्र ठरतात.

१ आॅक्टोंबर २०२२ नंतर अशी कुठलीही व्यक्ती ह्या योजनेत गुंतवणूक करू शकत नाही जी आयकर भरत आहे.

अटल पेंशन योजनेमध्ये गुंतवणुक केल्यास ६० वय झाल्यानंतर आपल्याला मासिक पेंशन प्राप्त होते.हे पेंशन दरमहिन्याला एक हजार रुपये पासुन पाच हजार रुपये पर्यंत दिले जाते.

आपल्याला पेंशन मध्ये किती रूपये प्राप्त होणार हे आपण ह्या योजनेत किती पैशांची गुंतवणूक करतो ह्यावर देखील अवलंबून असते.

अटल पेंशन योजनेमध्ये आपल्याला साठ वय झाल्यानंतर दर महिन्याला जितके पेंशन हवे आहे तितकी गुंतवणुक देखील आपणास करावी लागते.

अटल पेंशन योजनेमध्ये आपल्याला किती गुंतवणक करावी लागेल हे आपल्या वयावर सुद्धा निर्भर असते.हया योजनेत आपण जितक्या लवकर गुंतवणुक करायला सुरुवात करतो तितके कमी पैसे आपणास इथे गुंतवावे लागतील.

समजा एखाद्या व्यक्तीने एक हजार रुपये दरमहा पेंशन स्कीम निवडली.अणि अठरा वर्षांचा असताना त्या व्यक्तीने योजनेत गुंतवणुकीस सुरूवात केली आहे.

तर त्या व्यक्तीला दरमहा ४२ रूपये जमा करावे लागतील.याचठिकाणी त्या व्यक्तीने २८ वर्षांचा असताना योजनेत गुंतवणुक केली तर त्याला दरमहिन्याला ९७ रूपये भरावे लागतील.

अणि ३८ वर्षांचा असताना योजनेत गुंतवणुक करायला सुरुवात केली तर त्याला दरमहिन्याला २४० रूपये भरावे लागतील.

अटल पेंशन योजनेमध्ये किती कालावधी करीता गुंतवणुक करावी लागेल ?

अटल पेंशन योजनेमध्ये गुंतवणुकदार १८ ते ४० वयादरम्यान गुंतवणुकीस सुरूवात करू शकतात.अणि ६० वय पुर्ण होईपर्यंत त्यांना ह्या स्कीम मध्ये दरमहा पैसे भरावे लागणार आहे.

अटल पेंशन योजना ही असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी श्रमिकांसाठी वंचितांसाठी सुरू करण्यात आली आहे म्हणून ह्या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी काही सवलती देखील देण्यात आल्या आहेत.

ह्या योजनेत आपणास दरमहा तिमाही किंवा सहामाही पद्धतीने गुंतवणुकीची रक्कम जमा करता येते.

अटल पेंशन योजनेमध्ये गुंतवणुक करण्याचे फायदे कोणकोणते आहेत ?

अटल पेंशन योजनेमध्ये गुंतवणुक करण्याचे काही महत्वाचे फायदे पुढीलप्रमाणे आहेत-

१) अटल पेंशन योजनेमध्ये गुंतवणुक केल्यास आपल्याला साठ वय झाल्यानंतर दरमहिन्याला गॅरंटेड पेंशन प्राप्त होते.

२) अटल पेंशन योजनेच्या लाभार्थींचा मृत्यू झाल्यास त्याच्या मृत्यूनंतर पेंशनची रक्कम लाभार्थींच्या पती किंवा पत्नीला दरमहा दिली जाते.पण समजा अटल पेंशन योजनेचा लाभार्थीं अणि त्याची पत्नी दोघांचाही मृत्यू झाला तर अशा परिस्थितीत त्यांच्या वारसदाराला १ लाख ७० हजार पासुन ८ लाख ७० हजार इतकी एक रकमी रक्कम दिली जाते.

अटल पेंशन योजनेमध्ये आपले खाते कसे उघडायचे ?

अटल पेंशन योजनेमध्ये आपले खाते उघडण्यासाठी आपले बॅक किंवा पोस्ट खात्यात एक सक्रीय सेविंग अकाऊंट असणे आवश्यक आहे.

अटल पेंशन योजनेमध्ये गुंतवणुक करण्यासाठी सर्वप्रथम अटल पेंशन योजना खाते उघडावे लागेल हे खाते उघडण्यासाठी आपल्याला कुठल्याही एका बॅकेतुन अटल पेंशन योजनेचे अकाऊंट ओपन करण्याचा फाॅम घ्यायचा आहे.

फाॅममध्ये विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरून घ्यायची आहे.फाॅममध्ये आपल्याला आपली बॅकिंग सेविंग अकाऊंट डिटेल्स, पर्सनल डिटेल्स,पेंशन डिटेल्स भरायची आहे.

पेंशन डिटेल्स मध्ये आपल्याला आपला प्लॅन निवडुन घ्यायचा आहे.यात आपल्याला हे ठरवावे लागेल की आपल्याला दोन तीन हजार तसेच पाच हजार इत्यादी पैकी किती पेंशन साठ वय झाल्यानंतर दरमहिन्याला हवे आहे.

मग त्यानुसार आपल्याला दरमहा गुंतवणुकीची रक्कम ठरवावी लागेल.गुंतवणुक आपण दरमहिन्याला करणार किंवा तीन महिन्यांनी सहा महिन्यांनी करणार आहे हे देखील निवडुन घ्यायचे आहे.

समजा ज्या दिवशी आपल्याला गुंतवणुकीची रक्कम भरायची आहे त्यादिवशी आपल्या बॅक सेविंग अकाऊंट मध्ये पैसेच नसतील तर अशा परिस्थितीत आपल्याला एक महिन्याचा कालावधी पैसे जमा करण्यासाठी दिला जातो.

एक महिन्यानंतर आपल्या खात्यात पैसे येताच ते आपल्या खात्यातून कट केले जातात.

अटल पेंशन योजनेच्या लाभाचे स्वरूप

साठ वय झाल्यानंतर किती पेंशन प्राप्त करण्यासाठी किती पैसे गुंतवावे लागतील?

समजा एखाद्या व्यक्तीचे वय १८ आहे अणि त्याला दरमहिन्याला हजार रुपये इतकी मासिक पेंशन हवी आहे तर त्याला साठ वय होईपर्यंत दरमहा ४२रूपये भरावे लागतील.

समजा त्या व्यक्तीला महिन्याला दोन हजार रूपये इतकी पेंशन हवी असेल असतील तर त्याला साठ वय होईपर्यंत दरमहा ८४ रूपये भरावे लागतील.

त्या व्यक्तीला महिन्याला तीन हजार रुपये इतकी मासिक पेंशन हवी असेल तर त्याला साठ वय होईपर्यंत दरमहा १२६ रूपये भरावे लागतील.

जर त्या व्यक्तीला महिन्याला चार हजार रूपये इतकी मासिक पेंशन हवी असेल तर त्याला साठ वय होईपर्यंत दरमहा १६८ रूपये भरावे लागतील.

त्या व्यक्तीला महिन्याला पाच हजार रुपये इतकी पेंशन हवी असेल तर त्याला दरमहिन्याला २२० रूपये भरावे लागतील.

ज्या व्यक्तीचे वय २०,२५,३०,३५,४० दरम्यान असेल तर त्याला पुढीलप्रमाणे रक्कम भरावी लागते –

एखाद्या व्यक्तीने ४० वर्षाचा असताना त्याने हा प्लॅन सुरू केला अणि त्याला महिन्याला हजार रुपये हवे असतील तर त्या व्यक्तीला २९१ रूपये दरमहा भरावे लागतील.

याचठिकाणी एखाद्या व्यक्तीने ४० वर्षाचा असताना हा प्लॅन सुरू केला अणि त्याला महिन्याला दोन हजार रुपये हवे असतील तर त्या व्यक्तीला ५८२ रूपये दरमहा भरावे लागतील.

याचठिकाणी एखाद्या व्यक्तीने ४० वर्षाचा असताना हा प्लॅन सुरू केला अणि त्याला महिन्याला तीन हजार रुपये पेंशन हवी असेल तर त्या व्यक्तीला ८७३ रूपये दरमहा भरावे लागतील.

याचठिकाणी एखाद्या व्यक्तीने ४० वर्षाचा असताना हा प्लॅन सुरू केला अणि त्याला साठ वय झाल्यानंतर महिन्याला चार हजार रुपये पेंशन हवी असेल तर त्या व्यक्तीला ११६४ रूपये दरमहा भरावे लागतील.

याचठिकाणी एखाद्या व्यक्तीने ४० वर्षाचा असताना हा प्लॅन सुरू केला अणि त्याला साठ वय झाल्यानंतर महिन्याला पाच हजार रुपये पेंशन हवी असेल तर त्या व्यक्तीला १४५४ रूपये दरमहा भरावे लागतील

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top