आम आदमी ह्या शासकीय योजनेमध्ये एका वर्षाला फक्त दोनशे रुपये इतका प्रिमियम भरून आपणास 75 हजार पर्यंतचा लाभ प्राप्त होईल.
आम आदमी विमा योजना सर्वसामान्य नागरिकांना लाभ प्राप्त करून करून देण्यासाठी सुरू करण्यात आलेली एक महत्वाची योजना आहे.
आम आदमी विमा योजना ही भारत सरकादवारे 2 आॅक्टोंबर 2007 रोजी देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू करण्यात आली होती.
आम आदमी विमा योजना ही ज्या व्यक्तींचे उत्पन्न कमी आहे.अणि ज्या व्यक्तींना दरमहा फिक्स वेतन प्राप्त होत नाही अशा भारतातील नागरिकांच्या हितासाठी शासनाने ही योजना सुरू केली आहे.
आजच्या लेखात आपण आम आदमी विमा योजनेविषयी अधिक सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.
आम आदमी विमा योजना काय आहे?
आम आदमी विमा योजना ही देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी भारत सरकादवारे सुरू करण्यात आलेली एक महत्वाची योजना आहे.
आम आदमी विमा योजना ही एक केंद्र पुरस्कृत योजना आहे.
आम आदमी विमा योजनेमध्ये आपल्याला इन्शुरन्स अणि स्काॅलरशिप असे दोन फायदे प्राप्त होत असतात.
आम आदमी विमा योजनेमध्ये लाभार्थ्याला इन्शुरन्स तसेच त्याच्या मुलांच्या शिक्षणासाठी स्काॅलरशिप देखील मिळते.
आम आदमी विमा योजनेचा लाभ कोण घेऊ शकते?
आम आदमी विमा योजनेचा लाभ हा देशातील सर्वसामान्य गरीब नागरिकांना दिला जातो.
आम आदमी विमा योजनेचा लाभ ग्रामीण भागातील स्वताची जमीन नसलेले मजुर,२.५ एकरपेक्षा कमी बागायती,५ एकरपेक्षा कमी जिरायती शेतजमीन धारकांना ह्या योजनेचा लाभ दिला जातो.
तसेच दारिद्य्र रेषेखालील कुटुंबांना देखील ह्या योजनेचा लाभ दिला जातो.अशा कुटुंबामधील फक्त एकच व्यक्ती योजनेअंतर्गत कव्हरेज प्राप्त करण्यास पात्र ठरते.
आम आदमी विमा योजनेचे फायदे तसेच योजनेअंतर्गत दिले जाणारे लाभ कोणकोणते आहेत?
आम आदमी विमा पाॅलिसी खरेदी केलेल्या पाॅलिसी धारकाचा पाॅलिसीची अंतिम तारीख संपण्याच्या आधी नैसर्गिक रीत्या मृत्यू झाला तर अशा परिस्थितीत लाभार्थ्यांच्या वारसदाराला ३० हजार रुपये इतकी विम्याची मुळ रक्कम दिली जाते.
पण आम आदमी विमा पॉलिसी खरेदी केलेल्या पाॅलिसी धारकाचा अपघातात मृत्यू झाला तर अशा परिस्थितीत लाभार्थ्यांच्या वारसदाराला ७५ हजार रुपये इतकी रक्कम दिली जाते.
समजा पाॅलिसी धारकाला अपघातामुळे कायमचे अपंगत्व आले तसेच अपघातामध्ये पाॅलिसी धारकाचे दोघे डोळे अणि दोघे पाय गेले तर अशा दोघेही परिस्थितीत पाॅलिसी धारकाला ७५ हजार रुपये इतकी रक्कम दिली जाते.
पण पाॅलिसी धारकाचा अपघातामध्ये एक डोळा अणि एक पाय गेला असेल तर अशा परिस्थितीत विमाधारकाला ३७ हजार ५०० रूपये इतकी रक्कम दिली जाते.
आम आदमी विमा योजनेमध्ये विमा धारकाच्या नववी ते बारावी इयत्तेत शिकत असलेल्या जास्तीत जास्त दोन मुलांना प्रत्येकी शंभर रूपये दरमहा स्काॅलरशिप देण्यात येत असते.
ह्या योजनेमध्ये आपल्याला दरवर्षी फक्त २०० रूपये इतका प्रिमियम प्रत्येक सदस्यासाठी भरावा लागतो.ज्यातील ५० टक्के प्रिमियम म्हणजे शंभर रुपये केंद्र तसेच राज्य सरकारच्या दवारे शंभर रुपये इतका खर्च अनुदानित करण्यात आला आहे.
जर पाॅलिसी मध्ये वारसदाराचा स्पष्टपणे उल्लेख करण्यात आला नसेल तर विमा धारकाच्या मृत्यूनंतर त्याची विम्याची रक्कम त्याच्या कुटुंबाला दिली जात नाही.म्हणुन योजनेसाठी अर्ज भरताना वारसदाराचा स्पष्टपणे उल्लेख करावा.
आम आदमी विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी वयाची मर्यादा काय ठेवण्यात आली आहे?
आम आदमी विमा ह्या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी वयोमर्यादा किमान १८ अणि कमाल ५९ वर्षे इतकी ठेवण्यात आली आहे.
आम आदमी विमा योजनेअंतर्गत कोणकोणते आजार कव्हर केले जात नाही?
आम आदमी विमा योजनेअंतर्गत दवाखान्याचा खर्च कव्हर केला जात नाही.
पाॅलिसी धारकाला मानसिक विकारामुळे मृत्यू किंवा अपंगत्व आले तर ते देखील ह्यात कव्हर केले जात नाही.
पाॅलिसी धारकाने आत्महत्या केल्यास तो खर्च देखील ह्या योजनेमध्ये कव्हर केला जात नाही.
देशात युदध झाल्यामुळे पाॅलिसी धारकाचा मृत्यू झाला किंवा त्याला अपंगत्व आले तर तो खर्च देखील ह्या योजनेमध्ये कव्हर केला जात नाही.
पाॅलिसी धारकाने धोकादायक तसेच साहसी खेळात भाग घेतला अणि त्यात त्याचा मृत्यू झाला किंवा अपंगत्व आले तर त्याचा खर्च आम आदमी विमा योजनेमध्ये कव्हर केला जात नाही.
पाॅलिसी धारकाने बेकायदेशीर कामात भाग घेतला असेल किंवा त्याने मादक पदार्थाचे सेवन केल्यास त्याचा मृत्यू झाला किंवा त्याला अपंगत्व आल्यास त्याचा खर्च आम आदमी विमा योजनेमध्ये कव्हर केला जात नाही.
आम आदमी विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे अणि कसा करायचा?
आम आदमी विमा योजना ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही इतर रेग्युलर विमा योजना खरेदीपेक्षा वेगळी असते.
आम आदमी विमा योजना ही एक राष्ट्रीय योजना असल्यामुळे ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला शासनाने नियुक्त केलेल्या नोडल एजन्सी मध्ये जावे लागते.
आम आदमी विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी तसेच योजनेकरीता नोंदणी करण्यासाठी आपल्याला जिल्हाधिकारी कार्यालय/तहसीलदार संजय गांधी योजना तलाठी कार्यालयात जावे लागेल.योजनेचा फाॅम घेऊन तो व्यवस्थित भरावा लागेल
अणि मग विहित नमुन्यातील अर्ज तसेच त्याला इतर जोडलेली आवश्यक कागदपत्रे जोडुन जमा जिल्हाधिकारी कार्यालय तहसीलदार कार्यालय किंवा तलाठी कार्यालयात जमा करावा लागेल.
आम आदमी विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जासोबत आपणास जोडावी लागणारी कागदपत्रे
- अर्जदाराचे ओळखपत्र म्हणून पॅनकार्ड किंवा आधार कार्ड
- पत्याचा पुरावा म्हणून आधार कार्ड किंवा लाईटबील
- वारसदार अर्ज
- उत्पन्न प्रमाणपत्र
- विहित नमुन्यातील अर्ज
आम आदमी विमा योजनेचा मुख्य हेतु
सर्वसामान्य नागरिकांना विमा संरक्षण प्राप्त करून देणे त्यांच्या नववी ते बारावी इयत्तेत शिकत असलेल्या मुलांना दरमहा शिष्यवृत्ती देणे हे ह्या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
आम आदमी विमा योजनेचे वैशिष्ट्य
आम आदमी विमा योजना ही सर्व प्रवर्गासाठी नागरिकांसाठी लागु करण्यात आली आहे.म्हणजे कोणत्याही जातीतील व्यक्ती ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरते.